News24 Today

Latest News in Hindi

सौंदड येथे सोनार समाजाचे आराध्या दैवत असणाऱ्या संत शिरोमणी नरहरी महाराज यांची 907 वी पुण्यतिथी संपन्न

1 min read

गोंदिया,सडक अर्जुनी,20 फेब्रुवारी 2022- सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड येथे दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोज रविवारला सुवर्णकार समाज समिती सौंदड यांचा वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सौंदड येथील सुवर्णकार समाज भवण येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भवनात प्रारंभी संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले . तसेच आकर्षक सजावटीसह सुवर्णकार समाज बंधू भगिनी व सुवर्णकार सराफा व्यावसायिक बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुवर्णकार समाज समितीचे अध्यक्ष नितीनजी यावलकर ,उपाध्यक्ष प्रभाकर जी यावलकर, सचिव राहुल यावलकर, सहसचिव हर्षल यावलकर, कोषाध्यक्ष वेद परसोडकर, अशोकजी कावळे , संकेत यावलकर , व इतर सहकारी यांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल यावलकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *