News24 Today

Latest News in Hindi

आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते कोहमारा येथे सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन

1 min read
Ad

गोंदिया,सडक अर्जुनी,18 फेब्रुवारी 2022- जवळच्या कोहमारा येथे स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमीपूजन आ.मनोहर चंद्रिकापूरे यांचे . हस्ते करण्यात आले . यावेळी गटविकास अधिकारी श्रीकांत वाघाये , सरपंच वंदना खोटे , ग्रामसेवक शहारे , मुन्ना देशपांडे , उज्वल चौधरी , पिंटू भिमटे , ग्रा . प . सदस्य , गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते .

गावाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक कामे यापूर्वी मंजूर केले आहे . त्यामुळे मंजूर कामातून गावाचा विकास करण्यावर आपला भर आहे . यापूढेही अनेक कामाचे नियोजन हाती घेतले असून विकासात्मक कार्यवर विशेष भर असल्याचे आमदार चंद्रिकापुरे यांनी यावेळी सांगीतले .
दिलीप काटंगे ते मनोहर भीमटे , पेरोपकार गेडाम ते अमित भावे, प्रशिकबुद्ध विहार ते प्रदिप पंचभाई, वार्ड क्र,३ मध्ये आंगणवाड़ी ते सोमजी रोकडे यांच्या घरापर्यंत एकूण ३० लक्ष रुपयांचे रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *