माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांसह महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढून महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी,16 जानेवारी 2022- महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष अर्जुनी-मोर विधानसभातर्फे माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर ( दी. 15 ) रोजी विराट मोर्चा काढून महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने येत्या महिन्याभरात वीजेच्या समस्या सोडविल्या नाहीत तर जिल्हाभरात भाजपातर्फे रस्त्यावर उतरत सरकारला सडो की पळो करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा महाविकास आघाडी सरकारला देण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या जुलमी राजवटित महावितरणचा अतिशय भोंगळ कारभार सुरू आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांकडे दुर्लक्ष करीत बिनबोभाटपणे विजतोडणी सुरू आहे. सहा-सात महिने मागणी करूनसुद्धा ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. कृषीपंपाचे मीटर रिडींग प्रमाणे विजेची आकारणी करण्यात येत नाही आहे. गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असुनही गडचिरोली जिल्हा प्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा चोवीस तास वीज पुरवठा करण्यात येत नाही. आणि त्यात आता शेतात पाणी असुनसुद्धा वीज वितरण महामंडळाच्या भोंगळ नियोजनामुळे जगावे की मरावे या परिस्थितीत शेतकरी आहे.
राज्यातील ठाकरे सरकार हे जनतेच्या – शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष करीत आहे, असे विविध आरोप माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी महविकास आघाडी सरकार वर केले, दरम्यान शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला, भाजप च्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, हा मोर्चा राजकुमार बडोले माजी मंत्री यांच्या घरून सडक अर्जुनी शेंडा मार्गे विद्युत कार्यालयावर आला दरम्यान कोहमारा चौकातून देवरीला ट्रॅक्टर व मोटार सायकल , चार चाकी वाहनाने हा मोर्चा देवरी च्या भाजप कार्यालयावर पोहोचला काही काळानंतर हा मोर्चा महावितरण कार्यालयावर पोहोचला यावेळी हजारो च्या संकेत शेतकरी उपस्थित होते, शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत असे अधीक्षक अभियंता यांनी मानले, काही मागण्या मान्य करून लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले, निवेदन दिल्यानंतर भाजप च्या वतीने भोजनाचे आयोजन स्थानिक मंदिर मध्ये केले होते.
यावेळी माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले, भाजप प्रदेश सचिव माजी आमदार संजय पुराम, आमदार डाॅ.देवराम होळी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, भाजपा पदाधिकारी – कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.