News24 Today

Latest News in Hindi

राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वरील सावंगी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ ठार.

1 min read
Ad

गोंदिया, सडक अर्जुनी,05 फेब्रुवारी 2022-तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वरील सावंगी येथे किराणा दुकानासमोर एक चितळ मृत अवस्थेत पडून आहे अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळ गाठले.यावर स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार आज दि.5 फेब्रुवारी रोज शनिवार ला सकाळी 6-7 वाजेदरम्यान एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 4 वर्षीय नर प्रजातीचा चितळ जागीच ठार झाला.मृत चितळाला वनविभागाने ताब्यात घेऊन कोहमारा येथील कार्यालयात आणण्यात आले व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत पोस्टमर्टम करून आज दि 5 फेब्रुवारी रोज शुक्रवारला डेपो -डोंगरगाव येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. अशी माहिती वनविभाग कार्यालय मार्फत प्राप्त झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *