तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने धावपटू स्पर्धेत 2 स्वर्णपदक विजेत्या हिना मुनीश्वर यांचा सत्कार.
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी,०५ फेब्रुवारी २०२२– तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज सौंदड येथील निधी मोटर्स येथे २ स्वर्णपदक विजेत्या हिना मुनेस्वर हीचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले, तर ती नेपाळ ला देखील पुन्हा खेळण्यासाठी जाणार आहे, त्या मुळे तिला आर्थिक मदतीची गरज आहे, संघाच्या सदस्यांनी मिळून थोडी का होईना आर्थिक मदत केली आहे.
ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडू विद्यार्थीनीने राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तरप्रदेश व गोवा येथे युथ गेम कॉन्सील ऑफ इंडिया ने आयोजित केलेल्या ३०० मीटर लांब धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन २ सुवर्णपदक प्राप्त करुन तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावल्याबद्दल तीचा विविध ठिकाणी सत्कार केला जात आहे, तर तिला विविध माध्यमातून शूभेच्या देखील दिल्या जात आहेत.
सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम केसलवाडा येथील रहिवासी कु. हिना कैलास मुनिश्वर असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे, तिला अजून तुमच्या मदतीची गरज आहे, यावेळी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बबलू मारवाडे उपस्थित होते तर उपाध्यक्ष अश्लेष माळे, मार्गदर्शक सुशील लाडे, सदस्य वेद परसोडकर तर हिना चे आजोबा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.