डव्वा येथे जुगार खेळणाऱ्यांवर डुग्गीपार पोलिसांची कारवाई.
1 min read•मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री विश्व पानसरे यांचे मार्गदर्शनाखाली, मोजा डव्वा येथे जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई.
गोंदिया,सडक अर्जुनी , 03 फेब्रुवारी 2022- मा.पोलीस अधिक्षक गोंदिया श्री विश्व पानसरे यांचे आदेशान्वये जिल्हयातील सर्व अवेदय धंदयावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने डुग्गीपार पोलीस स्टेशन अतंर्गत अवेदय धंदयावर आळा बसावा म्हणून निरंतर पोलीस कारवाई सुरु असुन दिनांक ३१/०१/२०२२ रोजी सांयकाळी ०५/०० वा दरम्यान मौजा डव्या येथील डि.के.व्ही. भोजनालयाचे मागील पडीत जागेत काही ईसम तासपत्तीवर पैशाची बाजी लावुन जुगार खेळत असल्याची मुखबीरकडुन खबर मिळाल्यावर ठाणेदार श्री सचिन बांगडे यांचे नेतृत्वात पोलीस स्टॉपसह मोजा डव्वा येथील डि. के. व्ही, भोजनालयाचे मागील भागात लपत-छपत जावुन सापळा रचुन धाड टाकली असता जुगार खेळणाऱ्या ०७ लोकांना पकडण्यात आले. त्यांचेकडुन १) फळावर नगदी १,५००/- रुपये, २) जुगार खेळणान्या लोकांचे अंगझडतीत १६,६४०/- रुपये ३) एकूण ४ मोटार सायकल किंमत २,००,०००/- रुपये ४) ५२ तासपते किमत ४०/- रुपये असा एकुण २,१८,१८०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असुन आरोपी १) शैलेश धनिराम लटीपे वय २९ वर्ष रा.डब्बा २) ईश्वरदास जगनाथ लंजे वय ५० वर्ष रा. कोहळीटोला ३) नितीन रमेश भिमटे वय ३५ वर्ष ४) रमेश सोहनलाल अग्रवाल वय ५१ वर्ष रा.डब्बा ५) संजय डेकल येळे वय ३५ वर्ष राखजरी ६) धनपाल मलचंद टेभुरणे वय ३९ वर्ष रा.डब्बा ७) वामन आनंदराव खोटेले वय ४२ वर्ष रा. कोहळीटोला यांचे विरुदध कलम १२ अ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस हवालदार शिवलाल धावडे करीत आहेत.
मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री विश्व पानसरे सा., उपविभागीय पोलीस अधिकारों देवरी श्री. संकेत देवळेकर सा. ठाणेदार श्री सचिन वांगडे, पोहवा जगदेश्वर बिसेन, शिवलाल धावडे, पोलीस नाईक उत्तम दहीवले, संतोष राऊत, झुमन वाढई, महेंद्र सोनवाने, पोलीस शिपाई सुनिल डहाके पोलीस स्टेशन डुग्गीपार यांनी सदर कार्यवाही केली.