सडक अर्जुनी; अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ला तहसीलदाराने का सोडले ?
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी,२९ जानेवारी २०२२- तालुक्यातील ग्राम सौंदड येथे (दि.२८) रोजी सोमवरला अंदाजे सकाळी ०९ वाजता अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर ला तालुका तहसीलदार व त्यांच्या पथकाने पकडले, मात्र त्यावर काहीच कारवाई न करता सोडून दिल्याचे विस्वनिय सूत्रांनी सांगितले, यावर तहसीलदार बागळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदर वाहन चालकाला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यास सांगितले आणि समोर नदीपात्रात अन्य ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलो, मात्र अन्य ट्रॅक्टर मिळाले नाही, तर पकडलेला ट्रॅक्टर सुद्धा पळून गेला, त्याचे लोकेशन न मिळाल्याने कार्यवाई करता आली नाही, असे सांगितले, यात तहसिलदारांची हलगर्जी पणा दिसून येते, एमपीएससी करून अधिकारी आपला पदभार सांभाळतात मग असा अशिक्षित पना का ? सूत्रांनी दिलेल्या माहितनूसार महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर आहे तर ऑरेंज कंपनीची ट्रॉली आहे, त्यात वाहन चालक व मालकांचे सुद्धा नाव आमच्याकडे आहे, मग तहसीलदारांना का माहित नाही हा संशोधनाचा विषय आहे.
अनेक गावकऱ्यांनी हे दृश्य पाहिले , यात तहसीलदारांनी चिरी मिरी घेऊन वाहन सोडले असावेत अशी चर्चा गावात रंगली आहे, या पूर्वी सौंदड परिसरातून अवैध वाळू चा उपसा होत असल्या बाबद वृत आम्ही प्रकाशित केले होते, या बाबद् जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माहिती झाली, जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांना यावर विचारणा केली, त्यावर उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांनी स्थानिक तलाठ्यांना गरम दिलं, त्यावर तलाठ्यांनी चुलबद नदीच्या पिपरी घाटावर नदीपात्रात जाणाऱ्या मार्गावर जेसीबी द्वारे खड्डे मारले.
मात्र चोरांना शेंबर वाटा अशी म्हण आहे, खड्डे मारून सुद्धा वाळू चोरीचे प्रमाण थांबले नाही, सांगायचं म्हणजे अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वाळू चोरीला उधाण आल्याचे बोलले जाते, स्थानिक तहसीलदार यावर काय उपाय योजना राबविनार याकडे तालुका वासियांचे लक्ष लागले आहे, अट्टल वाळू माफिया पत्रकार आणि कर्मचाऱ्यांवर देखील हल्ले करण्यास मागे पुढे पाहत नाही.
(MKN)