News24 Today

Latest News in Hindi

गोंदिया येथील सामाजिक कार्यकर्ते भुरले यांच्यावर अज्ञात आरोपीने केला गोळीबार.

1 min read

गोंदिया,29 जानेवारी 2021-गोंदिया शहरातील सामाजिक कार्यकर्ते धनेद्र भुरले, यांच्यावर अज्ञात आरोपीने गोळीबार केला असून त्याच्यावर गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून गोंदियातील ज्येष्ठ सामाजिक सेविका सविता बेदरकर भुरले, याचे ते पती आहेत.

गोंदिया शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर धनेंद्र भुरले, यांच्या शेतावर अनाथालयाचे बांधकाम सुरु असून भुरले यांना आज संध्याकाळी ६ वाजे दरम्यान एका अज्ञात आरोपीने फोन करून तुम्ही कुठे आहेत असा विचारणा केली असता भुरले यांनी मी शेतावरून घरी परत येत आहे अशी माहिती फोन वरून दिली असता गोंदिया शहराला लागून असलेल्या कटंगी गावाजवळ अज्ञात आरोपीने त्यांना एका दुचाकी वाहनावरून येत रस्त्यात अडवत त्यांच्यावर गोळीबार केला असून हा गोळीबार छऱ्या वाल्या बंदुकीने केल्याने धनेंद्र भुरले यांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असून रामनगर पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *