सडक अर्जुनी येथील महावितरण कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांचा विविध समस्यांना घेऊन हल्लाबोल.
1 min read•मागणी पूर्ण नाही झाल्यास आंदोलन चा इशारा
गोंदिया,सडक अर्जुनी , 24 जानेवारी 2022-दिनांक 24 जानेवारी रोज सोमवरला सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकरी आक्रमक होऊन हजारो च्या संख्येत महावितरण कार्यालयावर धडकले. त्या वेळी उपविभागीय अभियंता (एम एस इ बी) सडक अर्जुनी यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावे विविध समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदनात दिल्या प्रमाणे शेतकऱ्यांना नोटीस न देता किंवा कोणतेही पूर्व सूचना न देता विद्युत पुरवठा खंडित करण्यात येते.
आता शेतात शेतकऱ्यांचे परे टाकलेले असून ते मारण्याच्या अवस्थेत आहेत. या करीता आमच्या कडे कोणताही उपाय उरलेला नाही. त्या मुळे तुम्ही तोडलेले कनेक्शन त्वरित जोडून द्या. जो पर्यंत धानाचे पैसे आमच्या खात्यात जमा होत नाही तो पर्यंत आम्ही बिलाचा भरणा करू शकत नाही. असे न झाल्यास आम्ही समस्त मीटर धारक शेतकरी उपोषणाला बसणार आहोत. अशे निवेदनात नमूद आहे. निवेदन देते वेळी मा. शेषराव गिऱ्हेपुंजे यांच्या सह तालुक्यातील शेतकरी हजारो च्या संख्येत उपस्थित होते.