विद्यापीठ सुधारणा विधेयक (काळे विधेयक) त्वरित मागे घ्यावे! – भा. ज. प. वी आघाडी चे तालुका अध्यक्ष यांच्या कडून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले.
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी, 16 जानेवारी 2022- विद्यापीठ सुधारणा विधेयक काळे विधेयक त्वरित मागे घ्यावे!
माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल या महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यात आले, या निर्णयामुळे राज्य सरकारचे आणि शिक्षण मंत्र्यांचे हस्तक्षेप वाढेल आणि पवित्र विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनेल, म्हणून आपण घेतलेले निर्णय हे त्वरित मागे घ्यावे. तसेच माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, महाराष्ट्र राज्य वर्षा बंगला माउंट प्लिजन्त रोड, वाळकेश्वर, मलबार हिल, मुंबई, महाराष्ट्र 400006. या पत्त्यावर पोस्ट द्वारे 1000 हजार पोस्ट पत्र पाठवण्यात आले. मा. इंजिनीयर राजकुमार बडोले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शना मध्ये व पारस पुरोहित जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशानुसार
तसेच मा. चंद्रशेखरजी बावनकुळे प्रदेश सरचिटणीस भाजपा. यांच्या उपस्थितीत तसेच त्यांच्या हस्तलिखित व स्वाक्षरीत केलेले अर्ज सुद्धा पोस्ट द्वारे पाठवण्यात आले. सर्वात अगोदर बाईक रॅली काढण्यात आले, व नंतर पवित्र विद्यापीठांना तुमच्या राजकारणाचा अड्डा बनवू नका विद्यापीठ सुधारणा विधेयक काळे विधेयक त्वरित मागे घ्यावे असे घोषणा देण्यात आले. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष रमेश लांजेवार व शेषरावजी गिरीपुंजे भाजपा जिल्हा सचिव, हर्ष मोदी जिल्हा महामंत्री युवा मोर्चा, भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा सचिव शुभम पराते, तालुका महामंत्री सौरभ खोटेले, युवा मोर्चाचे कोषाध्यक्ष राजेश पांडे, भाजपा विद्यार्थी आघाडी चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.