News24 Today

Latest News in Hindi

पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

1 min read

गोंदिया,03 जानेवारी 2022-सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२२ मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ति यांची जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने मा. श्री. विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक गोदिया यांच्या शुभहस्ते दिनांक ०३ जानेवारी २०२२ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस निरीक्षक तथा अति. कार्य., पोलीस उपअधिक्षक (मुख्य) श्रीमती तेजस्विनी कदम, पोनि प्रमोद घोगे, दिनेश तायडे, पोउपनि श्रीकात हत्तीमारे, ज्योती सुरसर तसेच पोलीस अमलदार व मंत्रालयीन स्टाफ उपस्थित होते.

Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *