News24 Today

Latest News in Hindi

आ.चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल.

1 min read

गोंदिया,सडक अर्जुनी, 01जानेवारी 2021-सडक अर्जुन नगरपंचायत साठी प्रभाग क्र . १५. १६,१७ हे प्रभाग यापूर्वी नामाप्र संवर्गाच्या उमेदवारांसाठी राखीव म्हणून जाहीर करण्यात आले होते . मात्र पुन्हा हे प्रभाग ‘ सर्वसाधारण ‘ म्हणून जाहिर करण्यात आले आहेत त्यानुरूप या प्रभागासाठी २९ डिसेंबर पासून नामांकन अर्ज सादर करण्यासाठी सुरवात झाली . त्यानुरूप आज दिनांक ३१ डिसेंबर अर्जुनी/मोर विधान सभा क्षेत्राचे आमदार मा. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित राष्ट्रवादी पक्षा कडून . प्रभाग क्र .१५ साठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका महिला अध्यक्ष रजनी गि-हेपुंजे , प्रभाग क्र. १६ साठी माजी प.स . सभापती वंदनाताई डोंगरवार , तर प्रभाग क्र . १७ साठी माजी नगराध्यक्ष देवचंद तरोणे यांनी नामांकन अर्ज दाखल केले.

Ad


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधरजी परशुरामकर , तालुकाध्यक्ष डॉ.अविनाशजी काशिवार , शहर अध्यक्ष प्रियंक उजवणे , दिलिप गभणे , समिक्षा उदापूरे , गोवर्धन खोब्रागडे, प्रमोद गि-हेपुंजे , तेजराम मडावी , शाहिस्ता शेख , कामीनी कोवे, सुबुर शेख , दिक्षा भगत , विश्राती गहाणे, देवेंद्र उदापूरे, फारूक शेख, मतीन शेख, अमर दिप, फौजिया शेख ,व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *