राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ.
राज्यात करोना संसर्ग पुन्हा एकादा झपाट्याने वाढू लागला आहे. मुंबई, पुणेसह अन्य प्रमुख शहारांमध्ये दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात आढळलेल्या नवीन करोनाबाधितांची संख्या ही ८ हजारांच्याही पुढे आहे. त्यामुळे निश्चितच ही चिंताजनक बाब म्हणावी लागणार आहे.
आज दिवसभरात राज्यात ८ हजार ६७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, आठ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.
याशिवाय राज्यात आज १ हजार ७६६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०९,०९६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.४६ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९०,१०,१५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,७८,८२१ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,७५,५९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १०७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पुण्यात आज ४१२ नवीन करोनाबाधित आढळले असून, येथील अॅक्टीव्ह केसेसची संख्या १ हजार ७९९ असल्याची माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.