आदर्श आचार सहितेचे उल्लंघन करणाऱ्या घाटबोरी/ते येथील सरपंच व उप सरपंच यांच्यावर कार्यवाई करण्यात यावी, तलाठ्याचे डूग्गीपार पोलिसांना पत्र.
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी,16 डिसेंबर 2021-ग्राम पंचायत तेली घाटबोरी येथिल सरपंच देवानंद सदाशिव वंजारी व उप सरपंच राजेश सोहनलाल राऊत यांच्यावर फोजदारी कार्यवाई करण्यासाठी परसोडी चे तलाठी किशोर ऋषी सांगोडे यांनी लेखी स्वरूपाचे पत्र डुग्गीपार चे ठाणेदार यांना दिले आहे, दिनांक 14 रोजी पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करून टाकी चे खोदकाम जेसीबीच्या साह्याने चालू केल्याच्या कारणाने आदर्श आचार सहितेचे उल्लंघन करणाऱ्या सरपंच व उप सरपंच यांच्यावर कार्यवाई करण्यात यावी असे पत्रात नमूद आहे, दिनांक 15 रोजी ही तक्रार डुग्गीपार पोलिसांकडे केली आहे, तहसीलदार सडक अर्जुनी यांच्या आदेश्या नुसार ही तक्रार तलाठी सांगोळे यांनी केली आहे.