पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण हद्दीत अवैद्यरित्या दारू विक्री करणारे ईसमाविरूध्द धडक कारवाई करून ८७९५०/- रू. चा मुद्देमाल जप्त.
1 min readगोंदिया,15 डिसेंबर 2021- विश्व पानसरे सा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी आगामी काळात निवडणूक असल्याने शांतता व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता अवैधरित्या दारू विक्री करणारे लोकांवर धाडी टाकून समुळ उच्चाटन करण्याचे आदेशीत केल्याने . ठाणेदार पोलीस स्टेशन गोदिया ग्रामीण यांनी त्याचे अधिनस्त असलेले अंमलदार यांना अवैधरित्या दारू विक्री करणारे ईसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेशीत केली असता त्यांनी पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण हद्दीत अवैद्य धंद्यावर धाडी टाकून कार्यवाही करण्यात आलेली आहे ती खालील प्रमाणे
• ग्राम नागरा येथे महिला आरोपी यांचे घरी अवैद्य दारू बाबत धाड टाकली असता त्याचे घराचे बाजूला असलेल्या जून्या घरात ५ प्लास्टीक ड्रममध्ये मोहा सडवा पास एकून ४३० किलोग्राम व दारू गाळण्याचे साहित्य असा एकून ४२२००/- रू. चा माल अवैधरित्या मिळून आल्याने गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच ग्राम तूमखेडा खुर्द येथील सूकचंद तुलाराम रणगिरे रा. तूमखेडा/खुर्द यांचवर अवद्य दारू विक्री करणे बाबत धाड टाकली असता तिचे घराचे समोरील हॉलमध्ये एका प्लास्टीक पिशवीत १५ नग देशी दारूचे पव्वे कि. ४५०/- रू. चा माल अवैधरित्या बिना पास परवाना मिळून आल्याने गुन्हा नोंद करण्यात आला. मौजा आसोली येथिल आरोपी नामे १) रणविर रोशन डोंगरे वय २७ वर्ष २) मिनेश रविद्र नागदेवे वय २७ वर्ष दोन्ही रा. आसोली यांचेवर अवैद्य मोहफूलाची दारू बाबत धाड घातली असता नवरगाव कला शेतशिवारात नदी किनारी हातभट्टी मोहफूलाची दारू गाळीत आहेत असे खबरेवरून त्या ठिकाणी जाऊन प्रो-रेड केली असता नदी परिसरातील नदीकिनारी झूडपीमध्ये ८ नग प्लास्टीक ड्रम मध्ये सडवा मोहाफूल पास ४०० किलो किमती ३२०००/- रू तसेच प्लास्टीक बोरीत ५० किलो वाळलेले मोहाफूल कि. ४०००/-रू. ४ प्लास्टीक बोरीमध्ये १०० गूळ कि. ६०००/- रू. व दारू गाळण्याचे साहित्य ३३००/-रू. असा ४५३००/ रू. चा माल अवैधरित्या मिळून आल्याने गुन्हा नोंद करण्यात आला.
दिनांक १४/१२/२०२१ रोजी पोलीस स्टेशन गादिया ग्रामीण ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान अवैद्यरित्या मोहफूलाची हा.भ. दारू विक्री करणारे व सड़वा मोहापास बाळगणारे ईसमाविध्द धडक दर्जेदार कार्यवाही करून एकून ३ दारूबंदीचे गुन्हे दाखल करून ४ इसमांवर कारवाई करून त्यांचेजवळून ८७,९५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करून कार्यवाही करण्यात आलेली आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलिस अधिक्षक श्री. विश्व पानसरे सा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. जगदीश पांडे सा. यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. गोदिया ग्रामीणचे ठाणेदार पो.नि. बाबासाहेब बोरसे, पो.हवा. मिल्कीराम पटले, अण्णा ब्राम्हणकर, गितेद्र डिब्बे, देवाजी बहेकार पो. ना, देवानंद पारधी, इंद्रराज भूते, मपोशि रंजिता तांडेकर, पुष्पा दिवटे पो. शि. जिवन जाधव, सचिन खोब्रागडे चा. पो.हवा. रामटेके यांनी केली आहे.