ट्रकच्या धडकेत विद्यार्थीनीचा मृत्यू, गोंदिया येतील घटना.
1 min readगोंदिया,14 डिसेंबर 2021- रामनगर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या राणी अवंतीबाई चौकात आज (दि. 14) सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येत असलेल्या सिमेटच्या ट्रकने (एमएच 35 एजे 1419 ) सायकलस्वार विद्यार्थीनीला चिरडल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
मृत विद्यार्थीनीचे नाव पायल महेश मस्करे असे असून ती गोंदिया तालुक्यातील कटंगी येथे मामा च्या येथे शिक्षण करण्यकरिता गेली होती. तसेच पायल महेश मस्करे मामा च्या येथुन शिक्षण करण्यकरिता कटंगी येथून गोंदिया ला शाळेत सायकलने जाणे येणे करित होती.
सदर मृत पावलेली मुलगी भडंगा येथील रहीवासी आहे. ती इयत्ता 11 वीची विद्यार्थीनी होती, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक या चौकात गतीरोधक असतानाही वाहनचालक चौकात भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याचे नेहमीच दिसून येते तर वाहतूक पोलीस हे एखाद्या कोपर्यात बसून फक्त बघ्याची भूमिकेत राहत असल्याचे नेहमीचेच झाले आहे.
वाहनाच्या गतीवर आळा घालण्यासाठी चौकात वाहतूकविभागाने बँरीकेटस लावण्याची गरज निर्माण झाली आहे.