आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन होईल-. आ. चंद्रिकापुरे.
1 min read• ग्राम म्हसगाव ता. गोरेगाव येथे अनेक नागरिकानी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात होत असलेले विकास कार्यवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश
गोंदिया,गोरेगाव,13 डिसेंबर 2021-राज्यात आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरली असून आमचे ज्येष्ठ नेते *खासदार मा.प्रफुल पटेल* यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष अधिक बळकट झाला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या सहकार्याची गरज आहे आपले सर्वांचे सहकार्य मिळाले तर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन होईल असा विश्वास आमदार. मनोहर चंद्रिकापुरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथे आयोजित आढावा सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खा. प्रफुल्ल पटेल व आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून अनेकांनी या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या सभेला राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, सरपंच सोमेश्वर राहंगडाले,वरिष्ठ नेते बाबा बिसेन ,लालचंद चव्हाण, सुरेश हरिणखेडे, रामेश्वरी रहांगडाले, शीलाताई पंधरे, श्रद्धाताई राहंगडाले, राजकुमार बोपचे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गिधाडी येथील प्रमोद उदापुरे, खुशाल येरणे, म्हसगांव येथील ,खेमराज बिझलेकर, हरीभाऊ शिवणकर, हरीलाल मडावी देवेन्द्र शहारे, सुनील इडपाते, किशोर बुद्धे, राजेश बुरडे, सुशील शेंदरे, ओमेश्वर कुंभले, रुपनलाला मोहनकर, विजय राऊत, के.डी. बघेले, श्रीकृष्ण गलोले, टोकराम बुरडे, गणपत शिवणकर, गोवर्धन किरसान, लोकराज बावनकर, यशवंत क्षीसागर, रविकांत बुरडे, परमानंद इडपाचे, कांशीराम शहारे, देवानंद शहारे, केनेन्द्र धुर्वे, उमाशंकर किरसान, चंदूलाल किरसान, रामचंद्र इडपाचे, गेंदलाल किरसान, रामेश्वर शहारे, टेकचंद बुद्धे, सुभाष शिवणकर, यशवंत शिवणकर, चुनवंतराव नंदेश्वर, प्रकाश शहारे, हेमराज बुद्धे, चेतन बघेले, अरविंद गलोले, विजय राउत, रामा कटरे, राजेंद्र शहारे, झामराव कुथे, इत्यादीनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.