News24 Today

Latest News in Hindi

गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुका रद्द करा ,अखिल भारतीय बापू युवा संगठन यांची मागणी.

1 min read

गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणुका रद्द करा -तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना अखिल भारतीय बापू युवा संगठन चे निवेदन

गोंदिया,गोरेगाव,विशेष प्रतिनिधी,09 डिसेंबर 2021- गोंदिया जिल्हयातील जि. प. तसेच पंचायत समितीचे संपूर्ण निवडणुक रद्द करणे बाबद तहसील कार्यालय गोरेगाव तहसिलदार यांचा मार्फत मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांना अखिल भारतीय बापू युवा संघटन गोरेगांव शाखा च्या वतीने दि. ०९/१२/२०२१ रोजी निवेदन देण्यांत येत आले.

निवेदनात म्हटले आहे की गोंदिया जिल्हयातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीचे निवडणुक रद्द करण्यात याव्यात कारण संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना माहामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आज नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण तसेच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या करिता महाराष्ट्र सरकार यावर कितीतरी उपाय काढत आहे. अश्या वेळी आम नागरीक नियमाचा उल्लंघन करीत आहेत. आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गोदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक झाली तर सर्वसामान्य नागरिक नियमांचा उल्लंघन करतील व कोरोना महामारीची लागण वाढू शकते, तसेच निवडणुकीच्या दरम्यान गर्दी चे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, म्हणून यावर आळा घालण्याकरिता निवडणुका रद्द करण्यांत यावी.

Ad

निवेदन देतेवेळी,अखिल भारतीय बापू युवा संघटन गोरेगांव गोंदिया जिल्हा मिडीया प्रमुख देवेंद्र दमाहे, बापू संघटन उप मीडिया प्रमुख गोंदिया ,गोरेगाव सुरेश साठवणे,अखिल भारतीय बापू संघटन गोरेगांव ,गोदिया मार्गदर्शक रंजीत वालदे,अखिल भारतीय बापू संघटन गोरेगाव मार्गदर्शक कमलेश मेश्राम , अखिल भारतीय बापू संघटन कार्यकर्ता गोरेगांव शहर दुर्गेश जगणे आणि तसेच
अखिल भारतीय बापु युवा संघटनेचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *