News24 Today

Latest News in Hindi

पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी.

1 min read

गोंदिया,08 डिसेंबर 2021- सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२१ मध्ये राष्ट्र पुरुष/धोर व्यक्ति यांची जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने मा. श्री. विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या शुभ हस्ते दिनांक ०८ डिसेंबर २०२१ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस निरीक्षक तथा अति कार्य पोलीस उपअधिक्षक (मुख्या) श्रीमती तेजस्विनी कदम, श्री प्रमोद घांगे, श्री महादेव तोंदले, श्री संदेश कॅनळे, श्री युवराज हांडे तसेच पोलीस अधिकारी/ अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ उपस्थित होते.

Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *