News24 Today

Latest News in Hindi

डोंबिवलीनंतर आता पुण्यात एकूण ओमायक्रॉनचे तब्बल ‘इतके’ रुग्ण आढळले आहेत.

1 min read

पुणे, वृत्तसेवा,08 डिसेंबर 2021-डोंबिवलीनंतर आता पुण्यात एकूण ओमायक्रॉनचे तब्बल 7 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या ही एकूण 8 इतकी झाली आहे. आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.

या 7 पैकी 6 जण हे पिंपरी चिंचवडमधील आहे. तर उर्वरित 1 जण पुण्यातील आहे. या 7 जणांना कोणतीही लक्षणं नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे या 7 जणांपैकी 3 जणांनी कोरोना लस घेतलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार सहापैकी 3 जण नायजेरियामधून आल्याची माहिती मिळाली आहे. तर इतर 3 जण त्यांच्या जवळचे असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी 13 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 45 वर्षांचा भाऊ, दीड वर्षे आणि 7 वर्षांच्या दोन मुलींना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे.

Ad

नायजेरीयावरून आलेल्या महिलेची लक्षणं अत्यंत सौम्य असून इतर 5 जणांना कोणतीही लक्षण नाही. मात्र त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 6 पैकी 3 जण 18 वर्षांखालील असल्याने त्यांनी लस घेतली नाही. तर उर्वरित 3 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

पिंपरी चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आल्याने आता चिंता वाढली आहे. त्यामुळे आता पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *