सडक-अर्जुनी तालुक्यात मोठे उद्योग उभारण्याची गरज ~कवी अश्लेष माडे.
1 min readमोठया प्रमाणात बेरोजगारी वाढल्याने तरुण हताश.
गोंदिया,सडक अर्जुनी,30 नोव्हेंबर 2021- तालुक्यात सध्या मोठया प्रमाणात बेरोजगारी वाढल्याचे चित्र दिसत आहे. म्हणून काही तरुण मिळेल त्या जागेवर मिळेल तो व्यवसाय उभारून संसाराचा गाडा चालवत आहेत. मात्र ज्यांना तोही पर्याय नाही असे अनेक शुशिक्षित तरुण बेरोजगार पडून आहेत. आणि वाईट मार्गाला जात आहेत. त्यामुळे तालुक्यात एम आय डी सी उभारण्यात यावी अन्यथा मोठे उद्योग उभारून स्थानिक तरुणांना हाताला काम द्यावा. अशी मागणी अश्लेष माडे यांनी केली आहे.
तरुण कोरोना मुळे शहराकडून आता गावाकडे परतले आहेत आणि गावातच स्थायिक होण्याचे स्वप्न बघत आहेत. मात्र रोजगार म्हणून तालुक्यात असं काहीच नसल्याने तरुणांच्या पदरी निराशा पडत आहे. म्हणून काही तरुण छोटा मोठा व्यवसाय करत आहेत. मात्र ऑनलाईन च्या ह्या दुनियेत मार्केटिंग अभावी व पुरेशा भांडवलाअभावी तेही संकटात आहेत. आणि त्यामुळेच अनेक तरुण स्वतःचे घर सोडून परिवाराच्या दूर हजारो किमी शहराकडे धाव घेत आहेत. संपूर्ण तालुका हा शेतीवर अवलंबून असून इतर रोजगाराचे पर्याय नाही म्हणून शेतीचे काम संपताच तरुण कामासाठी परराज्यात जात आहेत. त्यामुळे तालुक्यात एमआयडीसी किंवा मोठे उद्योग उभारण्याची नितांत गरज आहे. जेणेकरून तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि ते आपल्या गरजा पूर्ण करू शकतील. अनेक लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या वेळी रोजगार देण्याची आस्वासने देतात परंतु तालुक्यात एवढे लोकप्रतिनिधी असूनही आतापर्यंत बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न केले नाही. आणि त्यामुळेच दररोज शेकडो तरुणांचा गोतावळा शहराकडे जाताना दिसत आहे. घर सोडून कामासाठी दुरवर जाणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी तालुक्यात रोजगाराची नितांत गरज आहे. म्हणून तालुक्यात एमआयडीसी किंवा मोठे उद्योग सुरु करून तरुणांना रोजगार मिळवून द्यावा, अशी मागणी कवी तथा राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघचे तालुकाध्यक्ष अश्लेष माडे यांनी केली आहे.