भामरागडच्या प्रलंबित समस्या तातडीने दूर करणार – खासदार अशोक नेते यांची ग्वाही.
1 min read
गडचिरोली,भामरागड,25 नोव्हेंबर 2021-भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार अशोक नेते यांनी आज दि. 25 नोव्हेंबर रोजी भामरागड तालुक्याचा दौरा केला व तेथील व्यापारी संघटना तसेच गोरगरीब नागरिक व शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी, समस्या जाणून घेतल्या. व सदर समस्याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तसे निर्देश देऊन लवकरच समस्या सोडविण्याचे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले. दौरा दरम्यान भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री (संघटन ) रवींद्रजी ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, आदिवासी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष संदीपजी कोरेत, जिल्हा सचिव सुनील बिस्वास, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश मारगोनवार, भाजप सोशल मीडिया सेलच्या अहेरी विधानसभा संयोजक रंजुताई सडमेक, माजी सभापती निर्मला सडमेक, बेबीताई पोरतेट, तसेच व्यापारी आघाडीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खासदार अशोक नेते यांना भामरागड येथील नागरिकांनी विविध अडचणी व समस्यांचे निवेदन दिले. यात प्रामुख्याने घरकुल मिळालेले नाही, 5 महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळालेला नाही, राशनचे अन्नधान्य मिळालेले नाही, वन जमिनीचे पट्टे मिळालेले नाही यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. यावेळी खासदार अशोक नेते यांनी नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही दिली.
