बापरे!! महिलांनी केला शिवसेना जिल्हाप्रमुखांवर गंभीर आरोप…
1 min read• पांढरी येथील दारूबंदी करणाऱ्या महिलांनी केला शिवसेना जिल्हाप्रमुखांवर आरोप.
• पैसे घेऊन सहकार्य करीत नसल्याचा आरोप.
गोंदिया,सडक अर्जुनी,20 नोव्हेंबर 2021-तालुक्यातील ग्राम पांढरी येथील जिजामाता महिला परिवर्तन पॅनल तसेच शिवसेना महिला कार्यकर्त्या गेल्या वर्षभरापासून दारूबंदी साठी लढा देत आहेत. यासंदर्भात दारूबंदी साठी निवडणूक सुद्धा पार पडली. शासनाच्या परिपत्रकानुसार या महिलांनी व गावकरी महिलांनी मिळून दारूबंदी साठी शिवसेना जिल्हाप्रमुख गोंदिया सोबतच मा. जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन दिले. त्यावेळेस जिल्हा प्रमुखांनी निवेदनसोबत आपले स्वतःचे लेटर पॅड लावले. परंतु सही पडताळणी व दारूबंदी साठी झालेल्या निवडणुकीत महिलांना सहकार्य केले नाही. असा आरोप या महिलांनी केला आहे. निवडणुकीत 1100 पैकी 834 महिलांनी दारूबंदी झाली पाहिजे म्हणून मतदान केले. तसेच निवडणूक नंतर राजेंद्र दाजीबा वाढई वय 45 वर्ष या व्यक्ती ने दि.4 आक्टोबर 2021 ला दारूच्या नशेत स्वतःच्या पत्नीवर अत्याचार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे विरोधी पक्ष आम्हाला ताणें मारतात आणि बोलतात की, तुमच्या जिल्हा प्रमुखांने दारू दुकानदार कडून पैसे घेतले म्हणून ते तुम्हाला साथ देत नाही. त्यामुळे आमच्या संघटनेच्या महिलांना अपमानाचा सामना करावा लागतं आहे. परंतु जिल्हाप्रमुख व पोलीस प्रशासन हे आम्हाला सहकार्य करीत नाही. अशा आशयाचे निवेदन या महिलांनी मा. उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री यांना दिले. तसेच घोषणाबाजी करीत संताप व्यक्त करून नाराजी व्यक्त केली आहे. जेव्हा जिल्ह्यातील पक्षश्रेष्टी च आम्हाला मदत करीत नाही तर आम्ही जावं कुठे अशी खंत या महिलांनी व्यक्त केली.