शासनाच्या योजना गतिशील करा : खा.अशोक नेते
1 min readआमगाव तालुका आढावा बैठकीत नेते चे निर्देश.
गोंदिया,आमगाव,19 नोव्हेंबर 2021- केंद्र व राज्यशासनाने विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावे यासाठी शासन आदेश दिले आहे परंतु अनेक विभाग विकास कामांचे कामचुकार पणा करीत असल्याची तक्रारी पुढे आले आहे. यापुढे तक्रारींवर गंभीर दखल घेतली जाणार आहे, शासनाच्या योजना नागरिकांना लाभ देण्यासाठी विभागानी गतिशील कार्य करावे असे निर्देश आयोजित तालुका आढावा बैठकीत खा .नेते यांनी दिले.
आमगाव तहसील कार्यालयात शासकीय विभागांचे कार्यावर आढावा बैठक आयोजित करण्यात आले होते यावेळी बैठकीचे अद्यक्ष स्थानी खा.अशोक नेते, माजी आ.केशवराव मानकर,तहसीलदार दयाराम भोयर,खंड विकास अधिकारी रांगडाले,पोलीस निरीक्षक विलास नाळे, प्रा.कांशीराम हुकरे यावेळी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी यांनी विकास कामे यावर अहवाल सादर केले.
आयोजित सभेत खा.अशोक नेते यांनी धडक सिंचन योजनेतील शेतक-यांचे थकीत अनुदान बाबद राज्य शासनाकडे संदर्भ देऊन मागणी घालण्याचे निर्देश दिले.
घरकुल बांधकाम,धान खरेदीसाठी आठकडी दूर करून शेतकऱ्यांचे धान खरेदी करणे,आरोग्य विभागाने संपूर्ण लसीकरण करण्यावर अधिक प्रयत्न करण्यासाठी जनजागृती करणे यासह विविध कामांचे आढावा घेतला.
तसेच राष्ट्रीय राज्य महामार्ग यात निकृष्ट बांधकाम बांधकाम बाबद अधिकाऱ्यांना धारेवर घेत बांधकाम तपासणी करून बिले काढण्याचे निर्देश दिले. नगर परिषद येथील आठ कोटींचे अडलेले निधी व बांधकाम यावर उपविभागीय अधिकारी यांना कामचुकारपणा करिता कार्यवाही होईल असे संगीतले.
शासनाच्या योजना रावविण्यात गय केल्यास गंभीर परिणाम होईल , विकास कामांना गतिशील करा असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
आयोजित आढावा सभेत सुभाष आकरे,घनश्याम अग्रवाल,नरेंद्र बाजपेई,राकेश शेंडे,सुरेश कोसरकर,यशवंत मानकर,राजू पटले उपस्थित होते.