पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त तसेच राष्ट्रीय एकात्मक शपथ कार्यक्रमाचे आयोजन
1 min readदिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे मा. श्री. विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या शुभ हस्ते इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या छायाचित्रेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर मा. श्री. विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांनी राष्ट्रीय एकात्मक शपयेचे वाचन करून त्यापाठोपाठ उपस्थित पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांनी शपथेचे वाचन केले.
सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस निरीक्षक तथा अति, कार्य, पोलीस उपअधिक्षक (मुख्या) श्रीमती तेजस्विनी कदम, पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड, श्री प्रमोद घाँगे, श्री महादेव तांदले, श्री दिनेश तायडे तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते.