News24 Today

Latest News in Hindi

देवरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात खा. अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे विजय शिवणकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

1 min read


खासदार अशोकजी नेते व आमदार डॉ परिणयजी फुके यांची उपस्थिती.

देवरी,18 नोव्हेंबर 2021- देवरी येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजयभाऊ शिवणकर यांच्यासह देवरी- आमगाव विधानसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, विधान परिषदेचे आमदार डॉ परिणयजी फुके, माजी आमदार संजय पुराम, जिल्हा संघटन महामंत्री तथा गोंदिया- भंडारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख विरेंद्रजी अंजनकर, विजयभाऊ शिवणकर, भाजपचे ज्येष्ठ नेते झामसिंगजी येरणे, भाजपचे तालुका अध्यक्ष अनिलजी येरणे यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांना भाजपचा दुपट्टा देऊन त्यांचे भारतीय जनता पार्टीत प्रवेश देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

Advertise


यावेळी ज्येष्ठ नेते माजी तालुका अध्यक्ष प्रमोदजी संगीडवार, दिपकजी शर्मा, यादवराव पंचम,महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष देवकीताई मरई तसेच भाजपचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *