News24 Today

Latest News in Hindi

गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य शेतकरी, कार्यकर्ता मेळावा मा. खा. श्री शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत संपन्न

1 min read

गडचिरोली,18 नोव्हेंबर 2021- गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य शेतकरी, कार्यकर्ता मेळावा मा. खा. श्री शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत संपन्न.

Advertiseविदर्भाच्या चार दिवसीय दौर्‍यावर असतांना आज तालुका क्रिडा संकुल देसाईगंज (वडसा) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडचिरोली च्या वतीने आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा मा. खा. श्री शरदचंद्र जी पवार साहेब, खा. श्री प्रफुल पटेल जी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना श्री पवार साहेब म्हणाले की, या देशातील पर्यावरणाचा समतोल साधण्याचा व जंगलांचे संवर्धन करण्याचे गरजेचे आहे आणि हे संवर्धन करण्याचे काम आदिवासी समाज करतो. म्हणुन जो जल, जंगल, जमिन यांचे रक्षण करतो तो वर्ग म्हणजे आदिवासी आहे. पण भाजपाने एका कार्यक्रमात या वर्गाला वनवासी असा उल्लेख केला पण हे आदिवासी ला कदापिही मान्य नाही कारण हा वर्ग वनवासी नसुन या देशाचा मुलनिवाशी आहे. गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल असुन राज्याच्या शेवटच्या टोकावर आहे. येणाऱ्या काळातील या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ने जि.प., पंचायत समिती व नगरपरिषदेच्या जागांपैकी ५० टक्के जागा सर्वसाधारण कुटुंबातील महिलांना संधी उपलब्ध करून महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करून द्यावा. लोकांच्या भेटी गाठी घेत जनतेशी संपर्क साधून, पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न आपण करावा. या जिल्ह्याचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांना आघाडी सरकार मध्ये मर्यादित जागे मुळे मंत्रिमंडळात संधी मिळु शकली नाही पण येणाऱ्या काळात ही भरपाई भरुन काढु, जिल्हयाच्या विकासासाठी स्थानिक प्रश्नांवर जलसंधारण, पाटबंधारे, व अन्य उच्च स्तरिय व वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक लावुन या भागातील जनतेच्या विकासासाठी प्रयत्न नक्कीच करु. श्री प्रफुल पटेल म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकारने कर्ज काढुन सलग दोन वर्षे ७०० रुपये धानाला बोनस दिला. सरकारची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे पण मा. श्री शरदचंद्रजी पवार यांना विनंती करतो की या आमच्या भागातील शेतकऱ्यांना काही ना काही बोनस मिळवुन द्यावा.
यावेळी कार्यक्रमात मा. खा. श्री शरदचंद्रजी पवार साहेब, मा. खा. श्री प्रफुल पटेल जी सोबत सर्वश्री आमदार श्री धर्मराव बाबा आत्रामजी, माजी आमदार राजेंद्र जैन, श्री सुबोध मोहिते पाटील, आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे, आमदार श्री राजूभाऊ कारेमोरे, माजी खा. श्री मधुकर कुकडे, श्रीमती भाग्यश्रीताई आत्राम, शाहीन हकीम, हरिरामजी वरखडे, ऋतुराज हलगेकर, रवींद्र वासेकर, श्रीकांत शिवणकर, सुनील फुंडे, रमेश बंग, नाना पंचबुद्धे, प्रकाश गजभिये, प्रवीण कुंटे पाटील, जावेद हबीब, सुधीर राऊत, गंगाधर परशुरामकर, महेश तपासे, जगदीश पंचबुद्धे, ईश्वर बळबुधे, वर्षाताई शामकुळे, श्रीमती वंदना आवळे, जानबा मस्के, नरेश माहेश्वरी सहित मोठ्या संख्ने कार्यकर्ता व नागरिकगण उपस्थित होते।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *