मोबाईल वर सट्टा घेणा-या 03 आरोपींना अटक ,तीरोडा पोलिसांची कारवाई.
1 min readपोलीस अधीक्षक गोंदिया श्री विश्व पानसरे यांचे मार्गदर्शनाखाली अवैद्य सटटा घेणा-या आरोपींवर कारवाई करण्यासाठी दिनांक १७/११/२०२१ रोजी पोलीस निरीक्षक योगेश पारधी पोस्टे तिरोडा हे शहरात पेट्रोलिंग करीत असताना २१/०० वा. सुमारास गोपनीय सुत्रधार कडुन माहीती मिळाली की, महात्मा फुले वार्ड तिरोडा येथील एका घरातील मागील खोलीमध्ये काही ईसम बसुन लोकांकडून मोबाईल वर सट्टयाचे आकडे लिहून पैसे घेऊन हारजीतचा जुगार खेळवित आहेत. या माहीती वरुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे संबंधीत ठिकाणी रेड केली असता १) संदीप चंदनदास गजभिये रा. महात्मा फुले बॉर्ड तिरोडा २) सुरेश चमरु घोडमारे रा. संत कवरराम वार्ड तिरोडा ३) डेव्हिड रविकिरण बडगे रा. आंबेडकर वार्ड तिरोडा हे लोकांकडुन पैसे घेवुन मोबाईल वर सटटा चे आकडे लिहुन हारजीतचा जुगार खेळवितांनी मिळुन आल्याने त्यांच्या जवळुन १) ४ मोबाईल हँडसेट २) २ कॅलकुलेटर ३) १ लाकडी टेबल ४) २ चेअर ५) ५ दाटपेन ६) नगदी ६,००० रु. ७) २ मोटर सायकल ८) सटटाचे आकडेचा हिशोब चे कागदपत्रे असा एकुण १,०४,७२५ रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील सर्व आरोपीविरुध्द कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम सह कलम १०९ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह आरोपीतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई ही श्री विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक गोंदिया, नितीन यादव उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि योगेश पारधी महिला पोउपनि राधा लाटे, नापोशि श्रीरामे, बर्वे, वाढे चानापोशि कहालकर यांनी पार पाडली.