रामटोला येथे मंदिर भवनाचा लोकार्पण सोहळा. आ. कोरोटे यांच्या स्थानिक आमदार निधीतून मंदिर भवनाचे निर्माण.
1 min readआमदार कोरोटे यांच्या स्थानिक आमदार निधीतून विठ्ठल रुख्माई मंदिर भवनाचे निर्माण.
गोंदिया,देवरी/आमगाव,18 नोव्हेंबर 2021: आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या स्थानीक आमदार निधीतून बांधण्यात आलेले आमगाव तालुक्यातील रामाटोला येथील विठ्ठल रुखमाई मंदिर भवनाचा लोकार्पण सोहळा शनिवार(ता.१३ नोव्हेम्बर) रोजी आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आणि म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
या प्रसंगी रामाटोलाचे सरपंच प्रमिलाताई चाकोले, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष कमलबापू बहेकार, महिला तालुकाध्यक्ष अंजुताई बिसेन, माजी जि.प.सदस्य जियालाल पंधरे, पानगावचे सरपंच नामदेवराव दोनोडे, अशोक मेयर, इंद्रलाल पंधरे यांच्या सह रामाटोला परिसरातील बहुसंख्य भाविक गावाकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.