News24 Today

Latest News in Hindi

देवपायली येथे ट्रक चालकाच्या निष्काळजीपणाने सायकलस्वार चा जागीच मृत्यू.

1 min read

गोंदिया,सडक अर्जुनी,15 नोव्हेंबर 2021- दिनांक १४/११/२०२१ चे 15:03 वा दरम्यान यातील मृतक सायकलस्वार भालचंद्र चंदु नसरके उर्फ पुरी वय ६२ वर्ष रा.शिवमंदीर हिरबाजी मैदान सौदड ,तालुका स / अर्जुनी जि. गोंदिया हा आपले सायकलने बाम्हणीकडुन कोहमाराकडे आपल्या बाजुने येत असता मौजा देवपायली येथे देवरीकडुन येणा-या ट्रक क्र. एम.एच. ४० एके १८२० चे चालकाने आपले ताब्यातील वाहन भरधाव वेगाने हयगयाने निष्काळजीपणाने व रोडाचे भान न ठेवता चालवुन मृतकाच्या सायकलला मागेहुन धडक दिली असता सायकलस्वार खाली पडुन त्याला मार लागुन जागीच मरण पावल्याने त्याचे मरणास ट्रक चालक कारणीभूत झाल्याने फिर्यादी सुरेश गणपत बोरकर वय ४८ वर्ष रा. (पोलीस पाटील देवपायली) याचे तोड़ी रिपोर्ट वरून पोस्टे इग्गीपार येथे अप क. २९२/२०२१ कलम २७९ ३०४(अ) भादवि सहकलम १८४,१३४(अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि. पाढरे पोस्टे डुग्गीपार, हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *