पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे शहीद बिरसा मुंडा यांची जयंती साजरी.
1 min read
गोंदिया,15 नोव्हेंबर 2021-सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णयान्वये सन २०२१ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर पुरुष यांची जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे मा. श्री. विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या शुभ हस्ते शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंती निमीत्त त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमात पोलीस निरीक्षक श्रीमती तेजस्विनी कदम, श्री रंगनाथ धारबळे, श्री. प्रमोद घोंगे, तसेच पोलीस अधिकारी/अमलदार उपस्थिीत होते.
