अवैद्य दारु विक्री करणा-यांवर कारवाई एकुण ९९५००/- रूपयाचा मुददेमाल जप्त
1 min readगोंदिया,13 नोव्हेंबर 2021-पोलीस अधीक्षक गोंदिया श्री विश्व पानसरे याचे मार्गदर्शनाखाली अवैध दारु विक्री करणा-यांवर कारवाई करण्यासाठी दिनांक १२/११/२०२१ रोजी पो.स्टे. गोंदिया ग्रामीण परीसरात पोलीस निरीक्षक बाबासाहेब चोरसे यांचे आदेशान्वये ग्राम आसोली परीसरात पो.हवा गणवीर ब.न. ७७१ हे स्टॉपसह पेट्रोलींग करीत असताना मुखबीर कडुन खात्रीशीर माहीती मिळाल्याने ग्राम आसोली येथे राहणारे सुदेश ग्यानीराम गडपायले वय ५० वर्ष व संघर्ष सुदेश गडपायले वय २१ वर्ष दोन्ही रा. आसोली यांचे विरुद्ध दारुबंदी कायद्या अंतर्गत कायदेशीर कार्यवाही केली असता त्यांचे ताब्यात सडबामोहापास एकुण किमती ८०,०००/- रु. १० नग प्लास्टीक चापट ड्रम किमती १०,०००/- रु., जर्मन करच्या एकुण किमती २०००/- रु. अंदाजे २० लिटर हातभटटी मोहफुलाची दारु किमती २०००/- रुपये असा एकूण ९४,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला. तसेच मोजा आसोली येथील महीला आरोपी विरुध्द दारुबंदी कायद्या अंतर्गत कायदेशीर कार्यवाही केली असता ५० किलो सडवा मोहपास किमती ४०००/- रु. तसेच १५ लिटर हातभटटी मोहफुलाची दारु किमती १५००/- रुपये असा एकूण ५५००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला. अशा प्रकारे दोन्ही कार्यवाहीमध्ये एकूण ९९,५००/- रुपयाचा माल जप्त करून आरोपीताबिरुध्द पो.स्टे. गोदिया ग्रामीण येथे गुन्हे नोंद करण्यात आले असून आरोपीतांना अटक करुन चंद हवालात करण्यात आले. सदर गुन्हयाचा तपास पो.हना डिब्बे ब.न. २९२ हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही श्री विश्व पानसरे, पोलीस गोंदिया, श्री जगदीश पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया तसेच बाबासाहेब बोरसे, पोलीस निरीक्षक पो.स्टे. गोंदिया ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा, गणवीर ब.न. ७७१, पो.ना. भुते ब.न. १५९६, पो. शि. केवट ब.न. १९२९ मपोशि शेंदरे ब.न. २५४ व चापोहवा रामटेके ब.न. ७८३ यांनी पार पाडली.