News24 Today

Latest News in Hindi

मिनी टेम्पोचा भिषण अपघात १ मृत, ३ गंभीर लोहारा(देवरी) येथील घटना.

1 min read

गोंदिया,देवरी,12 नोव्हेंबर 2021 – देवरी तालुक्यातील लोहारा परिसरात मिनी टेम्पोचा आज शुक्रवार (ता.१२) रोजी पहाटे ६:३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला असून एकूण २० लोक त्यात सवार होते. त्यापैकी १ महिला जागीच मृत झाली असून ३ गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

प्राप्त माहिती नुसार छत्तीसगड वरून बोरकन्हार ला वीटभट्टयावर काम करण्यासाठी एका मालवाहक टेम्पो मध्ये २० लोक सवार होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे सदर अपघात घडला असून यामध्ये मोतीनबाई दहारिया (वय.४५) यांचा जागीच मृत्यू झाला असून ३ गंभीर रुग्णांना ग्रामीण रुग्णालय देवरी येथे हलविण्यात आले आहे.

Advertise..



सध्या महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद आहेत. दिवाळीच्या सणानिमित्त गावी गेलेले मजूर मिळेल त्या साधनांने आपल्या कामावर परत येत आहेत असेच मजूर परत येत असतांना एक दुर्घटना आज आमगाव – देवरी मार्गावररील लोहाराच्या नजीक घडली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील लोहारा परिसरात मिनी टेम्पो क्रमांक एम.एच. ३५ ए.जे.१८३२ ने छत्तीसगड राज्यातून मजूर घेऊन आमगाव तालुक्यातीक बोरकन्हार येथे वीट भट्ट्यावर काम करण्यासाठी येत असताना लोहारा येथे रस्ताच्या काम सुरु असल्या मुळे सिर्मेट रोडला साइड रीफिलिंग नसल्यामुळे टेम्पो रस्ताच्या साइडाला उतरली आणि पलटी झाली. टेम्पो मध्ये एकूण २० मजूर सवार होते. त्यापैकी १ महिला मजुर जागीच मृत झाली असून ३ गंभीर जखमी झाले आहेत . गंभीर जख्मीना जिल्हा रुग्णालय उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. आणि इतर किरकोळ जखमींना ग्रामीण रुग्णालय देवरी येथे दाखल करण्यात आले आहे.

इतर किरकोळ जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळी देवरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *