मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया यशस्वी.
1 min readवरिष्ठ ऑर्थो सर्जन डॉक्टरांच्या टिमने साधारण पाऊण तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर यांच्यावर शस्त्रक्रिया केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज (१२ नोव्हेंबर) HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. मानेच्या दुखण्यामुळे दोन दिवसांपुर्वी ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. वरिष्ठ ऑर्थो सर्जन डॉक्टरांच्या टिमने साधारण पाऊण तास त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. उद्धव ठाकरे ऑपरेशन थिएटर मध्येच आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी पुढील काही वेळ ते विश्रांती घेतील.
रुग्णालयात दाखल होण्यापुर्वीच मुख्यमंत्र्यांनी मानेच्या दुखण्यावर उपचार घेण्यासाठी आपण पुढील दोन-तीन दिवस रुग्णालयात भरती होणार असल्याची माहिती दिली होती. तसेच यावेळी त्यांनी आपल्या आजारपणाबद्दल माहिती देत जनतेला लसीकरणासाठी आवाहनही केलं होतं
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 10, 2021