प्रतापगड येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा.
गोंदिया,अर्जुनी/मोरगाव,(विशेष प्रतनिधी),10 नोव्हेंबर 2021 – स्थानिक पोलीस स्टेशन केशोरी येथे दि. 1 जुन रोजी अपराध क्रमांक 48/2021 कलम 302 भादवी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर खटल्याचा निकाल दि. 9 नोव्हेंबर रोजी लागला असुन मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया श्री.औटी साहेब यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी नामे कदीर रशीद शेख वय 52 वर्षे रा.प्रतापगड ता.अर्जुनी/मोरगाव जि.गोंदिया यास जन्मठेपेची शिक्षा व 100 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 7 दिवसाचा वाढीव कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
यातील आरोपी नामे कदीर शेख व त्याचे पत्नीमध्ये पैशाचे वादावरुन भांडण सुरु होते त्यावेळी त्याचा मुलगा हा तेथे येऊन कशाचे पैसे मागत आहे असे आरोपीस बोलला असता यातील आरोपीने त्यास शिविगाळ करुन निघुन जाण्यास सांगितले आरोपी हा वाईट वाईट शिविगाळ करीत असता नमुद मृतक नामे गवस अजीत मोहम्मद शेख वय 51 वर्षे रा.प्रातापगड ता. अर्जुनी/मोरगाव जि.गोंदिया हा तेथे येऊन आरोपीस शिविगाळ का करतोस म्हणून असे बोलला असता त्याने मृतकास मारपीट करुन त्याचे जवळ असलेल्या चाकुने मृतकाचे पोटात घोपल्याने मृतक हा जागीच मरण पावला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे,अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर,उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव,अतिरिक्त कार्यभार उपविभाग देवरी श्री.जालींदर नालकुल यांचे मार्गदर्शनात सदरचे गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप इंगळे ठाणेदार पोलीस स्टेशन केशोरी यांनी केला असुन पोलीस नायक दिपक खोटेले यांनी सदर गुन्ह्याच्या तपासात सहकार्य केले आहे गुन्ह्याचा खटला सुरु असतांना कोर्ट पैरवी अधिकारी स.फौजदार अनिरुद्ध रामटेके पोलीस स्टेशन केशोरी यांनी पोलीस स्टेशन केशोरी तर्फे कोर्टात काम पाहिले.
सदर खटल्यात शासनाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री.सतीश घोडे यांनी कामकाज पाहिले असुन सदर गुन्ह्यातील आरोपी गुन्हा घडल्यापासुन जेरबंद होता व गुन्ह्यास अवघे 5 महिने झाले असुन गुन्ह्यात दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात खटल्याचे कामकाज मा.न्यायालयाने जलद गतीने खटला चालवुन आरोपीस कठोर शिक्षा सुनावली आहे. मा.न्यायालयाने व पोलीसांचे याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मा.न्यायालयाने सदर खटल्यात दिलेल्या निकालाने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांवर वचक बसण्यास मदत होईल.