राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषा गौरव पुरस्कार कवी अश्लेष माडे यांना जाहीर.
1 min read• राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषा गौरव पुरस्कार कवी अश्लेष माडे यांना जाहीर
• मुंबई येथील सोहळ्यात होणार सन्मानित
गोंदिया, सडक अर्जुनी,10 नोव्हेंबर 2021- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद चा 2021 व्या वर्षातील राज्यस्तरीय आदर्श साहित्य सेवक भाषागौरव पुरस्कार 2021 कोहमारा येथील प्रसिद्ध युवक कवी, पत्रकार अश्लेष सुधाकर माडे यांना जाहीर झालेला आहे.
अश्लेष माडे यांच्या उत्कृष्ट साहित्याची दखल घेत याआधी सुद्धा अनेकदा विविध नामांकित संस्थातर्फे साहित्यभूषण, साहित्यरत्न, कवीरत्न असे अनेक महत्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. साहित्य क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा दरवर्षी या संस्थेतर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. अश्लेष माडे यांच्या उत्कृष्ट लिखाणाची दखल घेत यावर्षीचा राज्यस्तरीय गुणिजन गौरव महपरिषद राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषागौरव पुरस्कार 2021 जाहीर करण्यात आलेला आहे. संस्थापक अध्यक्ष ऍड. कृष्णाजी जगदाळे यांच्या हस्ते या पुरस्काराचे निवडपत्र अश्लेष माडे यांना देण्यात आले. सदर पुरस्कार येत्या 29 डिसेंबर ला मुंबई येथील सोहळ्यात समारंभाध्यक्ष पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत दिला जाणार आहे.