अपघातात अनोळखी इसमाने केली मदत व त्यानेच केली चोरी.
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी,09 नोव्हेंबर 2021-प्रकरण अशा प्रकारे आहे की, दिनांक ०८/११/२०२१ चे ०८:०० वा. ते ०८:३० वा. दरम्यान यातील फिर्यादी पुनेश्वर डोमा राऊत वय ५९ वर्ष रा दवड़ीपार पोस्ट सोनी, ना गोरेगाव, हे आपल्या जावयासोबत नागपुरला जात असतांना वडेगाव येथे अचानक मोटर सायकल क. एमएच ३५ ए.एफ ०३५३ समोर कुत्रे आल्याने मोटर सायकल वरील दोघेही खाली पडल्याने त्यांना एका अनोळखी इसमाने दवाखान्यात उपचारकामी नेले व तेथुन निघुन गेला व तोच ईसम अपघात झालेल्या ठिकाणी असलेल्या घरासमोरील व्यक्ती ला पैसे मागुन जखमी सोबत आहो असे बोलून मोटर सायकल चोरून निघुन गेल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे डुग्गीपार येथे अप का २९०/२०२१ कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास पोहवा / १३७६ सांदेकर पोस्टे डुग्गीपार, हे करीत आहेत.