पिकअप व मोटर सायकल च्या धडकेत 2 जखमी
1 min readगोंदिया , सडक अर्जुनी,9 नोव्हेंबर 2021-प्रकरण अशा प्रकारे आहे की, दिनांक ०१/११/२०२१ चे १५:१५ वा. ते १४:३० वा. दरम्यान मौजा घटेगाव ते गिरोला रोडवर टेमनी फाट्याजवळ यातील जखमी १) विलास किसन कापगते वय ४४ वर्ष रा गिरोला व त्याचा मुलगा २) सतिश विलास कापगते वय १७ वर्ष रा. गिरोला हे आपल्या दुचाकीने शेतातुन घरी परत जात असतांना समोरुन ४०७ पिकअप क्र. एम. एच ४० बी.एल. १३५१ चा चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात हयगयीने व लापरवाहीने चालवुन जखमीच्या मोटर सायकलला आगोरा सामोर धडक दिल्याने दोघांनाही जखम होण्यास कारणीभूत झाल्याने फिर्यादी रामु विसन कापगते वय ४२ वर्ष रा. गिरोला तालुका स/ अर्जुनी याचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे डुग्गीपार येथे अपक. २८९/२०२१ कलम २७९,३३७,३३८ भादवि सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास पोहवा / २०९ मुजारीया पोस्टे डुग्गीपार, हे करीत आहेत.