News24 Today

Latest News in Hindi

जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेले विस्फोटके पोलिसांनी केले जप्त.

1 min read

गोंदिया, सालेकसा,8 नोव्हेंबर 2021-दिनांक ०७/११/२०२१ रोजी नक्षल सेल गोंदिया यांना गुप्त बातमीदाराकडुन विश्वसनीय माहिती प्राप्त झाली की, पोलीस स्टेशन सालेकसा अंतर्गत सशस्त्र दूरक्षेत्र दर्रेकसा जंगल परिसरात घातपात घडवून आणुन पोलीसांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी स्फोटक साहित्य पेरुन ठेवलेले आहे अशी माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या अनुषंगाने श्री विश्व पानसरे पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री जालींदर नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव, यांच्या मार्गदर्शनात नक्षल सेल गोंदिया चे अधिकारी व अंमलदार, सी-६० गोंदिया व सी-६० सालेकसा येथील कमांडो पथक व बी.डी.डी.एस. पथक गोंदिया यांनी गडमाता पहाडी-बेवारटोला डॅम जवळील जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबवुन गडमाता पहाडी चे भागात संशयास्पद वस्तु आढळून आल्याने श्वान पथक व बी.डी.डी.एस. पथकाचे सहाय्याने खबरदारीच्या उपाययोजना करुन पाहणी केली असता नक्षलवाद्यांनी घातपात घडवुन आणुन पोलीसांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी स्फोटके साहीत्य लपवून ठेवल्याचे दिसून आले. सदर स्फोटक साहीत्य बी.डी.डी.एस पथकाच्या मदतीने बाहेर काढले असता खालील प्रमाणे साहित्य आढळून आले.

वरील प्रमाणे साहित्य आढळून आले.

सदर साहीत्य जप्त करण्यात आले असुन पो.स्टे. सालेकसा येथे गु.र.नं. २६९/ २०२१ कलम ३०७, १२०
भादंवी सहकलम १३,१८,२०,२३ यु.ए.पी.ए. सहकलम ४, ५ भारतीय स्फोटक पदार्थ कायदा सहकलम ३/२५
भारतीय हत्यार कायदा अन्वये नक्षलवाद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी, आमगाव श्री जालींदर नालकुल हे करीत आहेत.

सदर ची कारवाई श्री विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे मार्गदर्शनात श्री जालींदर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव पोनि श्री तायडे व अंमलदार नक्षल सेल गोंदिया, सी-६० कमांडो पथक गोंदिया, सी-६० कमांडो पथक सालेकसा, बिडीडीएस व श्वान पथक गोंदिया चे अधिकारी व अंमलदार यांनी केली असून कारवाई मध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *