पांढरवानी येथील जुगारावर डुग्गीपार पोलीसांची कारवाई.
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी,पांढरवानी,03 नोव्हेंबर 2021- डुग्गीपार पोलीस स्टेशन अतंर्गत अवैध धंदे करणाऱ्यावर वचक बसावा या करीता निरंतर पोलीस कारवाई सुरु असुन दिनांक ०१/११/२०२९ रोजी रात्री १०:०० वा. दरम्यान मोजा पांढरवाणी येथे सार्वजनिक रोडवर काही ईसम तासपत्तीवर पैशाची बाजी लावून जुगार खेळत असल्याची मुखबीरकडुन खबर मिळाल्यावर ठाणेदार श्री सचिन वांगडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संजय पांढरे हे पोलीस स्टॉफ सह पांढरवाणी येथे लपत छपत जावून सापळा रचुन थाड टाकली असता जुगार खेळणाऱ्या ०८ लोकांना पकळण्यात आले. त्यांचेकडून १) फळावर नगदी १४३०/ रुपये, २) जुगार खेळणाऱ्या लोकाचे अंगझडतीत ४८००/- रुपये ३) ०७ नग माबाईल किमंती २९४००/- रुपये ४) ५२ तासपत्ते कि. ३०/- रुपये असा एकुण ३५६६०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असुन आरोपी ९) प्रफुल यशंवतराव बंसोड वय २९ वर्ष २) अमरदिप भाऊदास बोरकर वय ४५ वर्षे ३) आशिष संजय मोटघरे वय २९ वर्ष ४) दिपेंद्र एकनाथ कापगते वय ३० वर्षे ५) मनोज गोपीचंद डोंगरवार वय ३५ वर्षे ६) अनिरथ मधुकर बंसोड वय ५१ वर्ष ७) मंगेश रामचंद्र मेंढे वय ३४ वर्षे ८) सुनिल रामकृष्ण कापगते वय ३२ वर्षे सर्व रा. पांढरवानी यांचे विरुदध कलम १२ अ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र सोनवाने करीत आहेत.
सदर कार्यवाही ठाणेदार श्री सचिन वांगडे यांचे मार्गदर्शनात सपोनि संजय पांढरे, पोहवा मनोहर गावडकर, पोलीस नाईक झुमन वाढई, महेंद्र सोनवाने, घनश्याम मुळे, पोलीस शिपाई सुनिल डहाके पोलीस स्टेशन डुग्गीपार यांनी केली.