News24 Today

Latest News in Hindi

आगामी दिवाळी सणानिमीत्ताने आदिवासी बांधवांना साहित्य वाटप,गोंदिया जिल्हा पोलीस विभागाचा अभिनव उपक्रम

1 min read

गोंदिया,30 ऑक्टोबर 2021-भारतीय संस्कृतीत दिवाळी हा सण सर्वांत मोठा व महत्वाचा सण आहे. गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येक व्यक्ती आपल्या मिळकतीनुसार हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आदिवासी नागरीक आपल्या उत्पन्नानुसार आपल्या व आपल्या कुटूंबाच्या मुलभूत गरजा पूर्ण करतात. समाजाला मुलभुत सुविधांची गरज असतानाच प्रेमाची आवश्यकता आहे. याचाचीकडे लक्ष देत आदिवासी नागरीक व त्यांच्या मुलांना मदत मिळावी या करीता पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे सो. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर सो. यांच्या संकल्पनेतुन गोंदिया • जिल्हयातील नक्षलग्रस्त आदिवासी भागात गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे नक्षलग्रस्त भागातील आदिवाशी बांधवांना आगामी दिवाळी सणानिमीत्ताने साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

गोंदिया जिल्हयातील पोलीस ठाणे चिचगड हद्दीतील नक्षल अतिदुर्गम भागातील मोजा बोदालदंड तसेच स.दु. गणुटोला हद्दीतील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील मोजा कथलीटोला व तुमडीकसा गावातील महिला व पुरुषांना दिनांक २९/१०/२०२१ रोजी साडी धोतर चे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, गोंदिया कॅम्प देवरी, स.पो.नि. श्री. शरद •पाटील, ठाणेदार पो.स्टे. चिचगड, स.पो.नि. श्री विठ्ठल करंबळकर (वाचक) अपर पोलीस अधीक्षक कार्यालय देवरी, पो.उ.नि. श्री. उत्तम नागरगोजे, प्रभारी अधिकारी स.दु. गणुटोला, श्री. मंगेश चानखेडे, स.दु. गणूटोला, पो.उ.नि. श्री. संतोष बहाकर, प्रभारी अधिकारी, देवरी उप मुख्यालय व पोलीस अमलदार तसेच सदर गावातील नागरीक, सरपंच व पोलीस पाटील उपस्थित होते.

आगामी दिवाळी सणानिमीत्ताने आदिवासी बांधवांना साहित्य वाटप हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर यांचे संकल्पनेतून गोंदिया जिल्हयात राबविण्यात आला आहे. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता गोंदिया जिल्हयातील दानशुर व्यक्तीनी आदिवासी बांधवांना जिवनाश्यक वस्तु पुरविण्याकरीता मोलाची साथ दिली. तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमलदार, सशस्त्र दूरक्षेत्र येथील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी अथक परिश्रम घेवून व्यवस्थीतपणे पार पाडले. पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर यांनी गोंदिया जिल्हयातील व इतर दानशुर व्यक्तीचे तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलातील अधिकारी/ अमलदार यांचे मनापासुन आभार व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *