News24 Today

Latest News in Hindi

चुलबंद मध्यम प्रकल्पाच्या लाभ क्षेत्र अंतर्गत पिक परिस्थिती बद्दल मा. आमदार यांनी शेतकऱ्यांशी केली चर्चा.

1 min read
Advertisement

गोंदिया,20 ऑक्टोबर 2021-दिनांक २९/१०/२०२१ शुक्रवार रोजी पाटबंधारे शाखा कार्यालय मुरदोली येथे मा. आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी अभियंता गोदिया पाटबंधारे विभाग गोदिया यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन खालील विषयावर शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली,
उन्हाळी धान पिका ऐवजी रब्बी पिक मध्ये मक्का , हरभरा मक्का ,घेण्याबाबत तसेच चुलबंद मध्यम प्रकल्पाचा कालवा व कॅनल ची दुरुस्ती संबंधित विषयावर चर्चा व नियोजन करण्यात आले.
त्यावेळी सोनाली सोनोने, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग गोंदिया. संजीव शहारे सहाय्यक अभियंता पाटबंधारे विभाग गोंदिया, डी के चौरागड़े शाखा अभियंता पाटबंधारे चुलबंद, शहारे कालवा निरिक्षक व पाणी वापर संस्थाचे अध्यक्ष , सदस्य , ग्रामपंचायत सरपंच , पोलीस पाटील , चुलबंद मध्यम प्रकल्प संबंधित गावातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *