News24 Today

Latest News in Hindi

सुंगंधित तंबाखू चा वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या जाळ्यात, 22,41,6700 रू. मुद्देमाल जप्त

1 min read

गोंदिया,सडक अर्जुनी,26 ऑक्टोबर 2021- रायपुर वरुन नवेगावबांध कडे निघालेल्या एका ट्रकमध्ये प्रतिबंधीत असलेला सुंगधी तंबाकुची वाहतुक होत असल्याची माहीती दि. 26/10/2021 रोजी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सचिन वांगडे यांना मुखबीर कडुन मिळाली .

त्या माहीतीच्या आधारे डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन वांगडे यांनी सहकारी पोलीस अमलंदार सोबत नवेगाव टी पांईट कोहमारा चौक नाकाबंदी करुन सदर ट्रकची तपासणी सुरु केली असता ट्रक क्र. एम. एच. 40 बि.जी – 3444 त्यामध्ये 1) 27 बॉक्स ज्यामध्ये सुगंधीत तंबाकु (मजा 108) चे 500 ग्रमचे 538 बॉक्स किं. 10,25,670/-2) 10 प्लास्टिक पोती ज्यामध्ये सुगन्धित तंबाकु (ईगल) चे 400 ग्रॅमचे 400 पॅकेट एकुण कि. 2,16000/- रुपये व ट्रक अंदाजे कि. 10,00000/ असा एकुण किंमती 22,41,670/- रुपयाचा मुद्देमाल पो.स्टे.ला जमा करुन ट्रकमधील प्रतिबंधीत सुगन्धित तंबाकु बाबत भंडारा येथील अन्न सुरक्षा सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन भंडारा यांना पत्राव्दारे कळविण्यात आले.

Advertisement

त्यांनी संपुर्ण मालाची तपासणी करुन त्यांचा लेखी अहवाल व रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे आरोपी 1) शाहरुख नासिर खान वय 27 वर्षे रा. नागपुर 2) गणेश गुप्ता रा.चंद्रपुर यांचे विरुदध अप. क्र. 280/2021 कलम 188,272,273,328 भादवी सहकलम 3,26 (2)(i), 26 (2) (iv),27 (2) (e),30 (2) (a), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 यानुसार गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

सदर कारवाई मा. श्री विश्व पानसरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, मा. श्री अशोक बनकर अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, मा. श्री जालंधर नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखाली पोली निरीक्षक सचिन वांगडे, सपोनि संजय पांढरे, नापोशि झुमन वाढई, पोशि महेंद्र सोनवाने यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *