News24 Today

Latest News in Hindi

नागपुरात नगरसेवकाच्या घरी चोरी; 50 तोळे सोन्यासह तिजोरी चोरी.

नागपुर – नागपुरात नगरसेवक व जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई यांच्या घरी चोरट्यांनी धाडसी चोरी करुन ५० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. ही घटना काल दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गवई यांचा सेमिनरी हिल्समध्ये मालाबार कॉलनीत गवई यांचा प्रशस्त बंगला आहे. १७ ऑक्टोबरला गवई कुटुंबीयांसह मुंबईला खरेदीसाठी गेले होते.

शनिवारी गवई नागपुरमध्ये परत आले. रविवारी दुपारच्या सुमारास त्यांनी बेडरुममधील लॉकर उघडले असता. त्यातील तिजोरी त्यांना गायब दिसली. त्यात पन्नास लाख रुपये किंमतीचे सोने, रोख रक्कम आणि मौल्यवान साहित्य होते. मात्र, चोरट्यांनी केवळ सोन्यावर डल्ला मारल्याची माहिती त्यांनी दिली. गवईंनी घटनेची तक्रार गिट्टीखदान पोलिसात फोनवरुन दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बंगल्याची तपासणी केली. त्यावेळी घरातील कोणत्याही साहित्याला हात न लावल्याचे दिसले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *