घटेगाव व धानोरा येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन.
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी,23 ऑक्टोबर 2021-सडक-अर्जुनी तालुक्यातील घटेगाव व धानोरा येथे २१ ऑक्टोंबर २१ ला अर्जुनी/मोर विधानसभेचे आमदार मा.मनोहर चंद्रिकापुरे यांच्या जनसंपर्क कार्यक्रम व विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला.
आमदार मा. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रयत्नाने यांच्या हस्ते घटेगाव येथे सत्यकरण महाराज चावडी बांधकाम भुमिपुजन, आंगणवाडी कडे जाणारा सिमेंट रस्ता बांधकाम भुमिपुजन, विंधन विहीर भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष डॉ.अविनाश काशिवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष डी. यू रहांगडाले, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र भेंडारकर, सरपंच शामराव वासनिक, उपसरपंच श्रीपत कवरे, विनोद इलमकर सदस्य, मुनेश्वर नेवारे सदस्य,रेखाताई कोसरकर सदस्या, सुनिताताई पारधी सदस्या, शालुताई कांबळे सदस्या, योगितताई शेंडे सदस्या, दूर्गाताई नेवारे सदस्या, व घाटेगांवातील मान्यव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच धानोरी येथील सुद्धा आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले त्यामध्ये अंगणवाडी बांधकाम १० लक्ष ,बुद्धविहाराला आवार भिंत ५ लक्ष, मालीदुंगा रोड ते धयेद्र पटले यांच्या शेतापर्यंत रोड १० लक्ष, केवलराम गजबे ते कुशाबराव जराते यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड, आदी विविध कामाचा समावेश आहे त्याप्रसंगी सरपंच प्यारेलाल पारधी, उपसरपंच सुरेश कोल्हे, राजेंद्र कुंभरे सदस्य, रामेश्वर गौतम सदस्य,
रविकांताबाई कुंभरे सदस्या, वैशालीबाई गजबे, गीताबाई पारधी व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.