पांढरी गावात झालेल्या भांडणात, राईस मिल समोरील ते तांदूळ भरलेले 25 ट्रक नेमके गेले कुठे ?
राईस मिल समोरील ते तांदूळ भरलेले 25 ट्रक नेमके गेले कुठे ?
गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक 22 ऑक्टोबर 2021 – तालुक्यातील ग्राम पांढरी येथे दिनांक 04 ऑक्टोबर रोजी 02 वाजता दरम्यान झालेल्या एका भांडणात एका मील्ट्री जवान च्या मेजर ला गावातील काही राईस मिल धारकांनी किरकोड भांडणावरून मारहाण केली होती, त्यात गावातील सर्व लोक मिल मालकाच्या विरोधात आणि मिल्ट्री जवान च्या बाजूनं उभी होती.
सर्व प्रथम न्यूज 24 टुडे न्यूज ने त्या बातमी ची दखल घेतली, किरकोळ भांडणाने मोठे भांडणात रूपांतर झाले, एकंदरीत मिल मालकांनी पैश्या च्या नशेत मिल्ट्री जवानाला जीवे मारण्याच्या उद्देशाने मार्गावरून उचलून मिलच्या आत नेले व मिलात कोंबून मारण्याचा एकंदरीत प्रयत्न केल्याचा आरोप गावकरी दबक्या आवाजात करीत आहे, मिल्ट्री जवान यांनी पोलिसांन कडे केलेल्या तक्रारीत नेमकं काय सांगितलं आहे ते अजून स्पष्ठ नाही मात्र त्यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये 9 लोकांवर डुग्गीपार पोलिश स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
त्यातच आरोपींना पैश्याच्या बळावर जामीन सुद्धा अल्पकाळात मिळाल्याची चर्चा गावात आहे, त्या मुळे गावातील नागरिक आरोपींच्या विरोधात असल्याचे विस्वसनिय सूत्र सांगतात, गेली 15 दिवसाचा कालावधी लोटला असला तरी गावात त्या भांडणाची आग अद्याप विजलेली नाही, त्या मुळे येत्या दीपावली ला हा भांडण अजून उग्र होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
गावातील नागरिकांच्या भल्यासाठी बोलणाऱ्या मिल्ट्री जवान यांना मारहाण झाल्याने नागरीक नाराज आहेत, त्यातच अनेक रिटायर्ड मिल्ट्री म्यान यांनी देखील या ठिकाणी भेट दिली होती, त्यांनी सुद्धा आपले मत वेक्त करताना मिल जाळण्याची चेतावणी संबंधित विभागाला दिली होती, त्याचा एक व्हिडिओ देखील सोसल मीडियावर व्हायरल झाला होता, करिता पोलीस विभागाने सुद्धा या प्रकरणाला हलक्यात न घेता खबरदारी घेणे गरजेचे आहे.
प्रकरण असा रंगला होता की, संपूर्ण जिल्ह्यात यावर चर्चा सुरू झाली होती, मिल च्या परिसरात स्थानिक नागरिकांनी घेराव केला होता, पोलीस आणि मिल्ट्री जवान या ठिकाणी दाखल झाले होते, त्यातच काही विपरीत घटना होऊ नये म्हणून मिल्ट्री जवान यांच्या निवासस्थानी 10 मिल्ट्री चे जवान काही दिवस गस्तीवर होते, तर मिल च्या परिसरात देखील पोलीस कर्मचारी गस्तीवर राहत होते असे सांगितले जात आहे, हा प्रकरण शान्त व्हावा म्हणून मिल्ट्री जवान यांना सॅटेल मेंट करिता ऑफर देखील दिली मात्र जवान यांनी नकार दिल्याने सूत्र सांगतात, मात्र भांडण ज्या मुख्य कारणावरून झाले तो प्रकरण म्हणजे मुख्य मार्गावर तांदळाचे भरलेले 25 ट्रक नेमके गेले कुठे हा देखील संशोधनाचा विषय आहे ? म्हणजेच प्रशासनाची भूमिका संशयास्पद ! आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.