पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे दिनांक :-१५/१०/२०२९ रोजी
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी…
1 min read
गोंदिया,16 ऑक्टोबर 2021-सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२१ मध्ये राष्ट्र पुरुष/थोर पुरुष यांची जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे मा. श्री. विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या शुभ हस्ते विज्ञानाचा परम भोक्ता असणारे व युवकांना सदैव प्रेरणा देणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमात पोलीस निरीक्षक श्रीमती तेजस्विनी कदम, श्रीमती वैशाली पाटील, श्री प्रमोद घोंगे, श्री महादेव तोंदले तसेच इतर पोलीस अधिकारी/पोलीस अंमलदार उपस्थित होते.