पोलीस मुख्यालय गोंदिया येथील “प्रेरणा सभागृहात”
दसऱ्याचे दिवस निमित्ताने शस्त्र पुजेचे आयोजन व शस्त्राविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…
1 min read
गोंदिया,16 ऑक्टोबर 2021-महाराष्ट्र शासनामार्फत Student Police Cadet Programme चा उददेश ८ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यामध्ये चांगली नितीमुल्ये रुजवून जबाबदारी नागरिक बनविणे हा आहे. त्याचे कारण ८ वी वर्गाचे वयोगटातील विद्यार्थ्याचे बुध्दीमत्ता लवचिक असते व आकलन शक्ति विपुल असते. त्याअनुषंगाने गुन्हयास प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतुक जागरुकता, सायबर क्राईम, नक्षलविरोधी जनजागृती अभियान, अंधश्रध्दा निर्मुलन, भ्रष्टाचार निर्मुलन, लिग संवेदनशिलता, महिला व बालकांची सुरक्षितता, बालविवाह, आईवडील गुरु यांचा सन्मान, समाजाचा विकास, दृष्ट सामाजिक प्रवृत्तीस आळा घालणे, नितीमुल्ये, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता तसेच हत्यार व दारुगोळा बाबत माहिती इत्यादी विषयावर सरकारी शाळेतील ८ वी वर्गातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे मानस आहे.
त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. विश्व पानसरे यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वा. दसऱ्याचे दिवशी पोलीस मुख्यालय गोंदिया येथे शस्त्र पुजा व विद्यार्थ्याना शस्त्राविषयी माहिती देण्याकरिता सदर कार्यक्रमाचे करण्यात आलेले होते. गोंदिया जिल्हा पोलीस घटकातील निवड करण्यात आलेल्या ४३ सरकारी शाळेपैकी ०५ शाळेतील अनुक्रमे १) न.प. लोअर सेंकडरी स्कुल, अंसारी वार्ड ता. जि. गोंदिया २) न.प. हायर सॅकडरी स्कुल, अंसारी वार्ड ता. जि. गोंदिया ३) एस. एस. गर्ल्स स्कुल, विठ्ठल नगर, अंसारी वार्ड, ता. जि. गोंदिया ४) माताटोली म्युन्सीपल, रामनगर वार्ड, ता. जि. गोंदिया ५) रामनगर म्युन्सीपल स्कुल, रामनगर वार्ड, ता. जि. गोंदिया येथील ०८ वी वर्गातील विद्यार्थ्यांना दसऱ्याचे दिवशी पोलीस मुख्यालय गोंदिया (कारंजा) येथे शस्त्र पुजेसाठी व शस्त्राबद्दल माहिती देण्याकरिता बोलाविण्यात आले होते. त्या अनुषंगाने राखीव पोलीस निरीक्षक श्री रमेश चाकाटे, पोलीस निरीक्षक श्री रंगनाथ धारबळे, अंदाजे ३० विद्यार्थी व त्यांचे वर्गशिक्षक यांचे उपस्थित विविध शस्त्राची पुजा करण्यात आली असून पोहवा नैलेश शेंडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शस्त्राविषयी उत्कृष्ठ अशा अत्यंत मोलाची माहिती दिली.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता रापोनि श्री रमेश चाकाटे, पोनि श्री रंगनाथ धारबळे, पोहवा सेवक राऊत, युवराज किरसान, नैलेश शेंडे, नापोशि राज वैद्य, राजु डोंगरे, पोशि प्रविण वाढीवे तसेच पोलीस मुख्यालय गोंदिया येथील कर्मचारी गण यांनी अथक परिश्रम घेतले.