माणसाने माणुसकीचा धर्म पालन करणे काळाची गरज –
आ. मनोहर चंद्रीकापुरे
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी,16 ऑक्टोबर 2021-माणसाने माणसासोबत संबंध कसे ठेवले पाहिजे हे सर्व प्रथम सर्वानी आपल्या अंगी गुण जोपासले पाहिजे आणि हेच जमत नाही त्यामुळे आपले माणसाशी असलेले नाते हे तुटत जाते. हेच विचार सरणी बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या जन्मापासून त्यांच्या 65 वर्षाच्या वयापर्यंत होती. भगवान गौतम बुद्धाला या देशाला नीतिमान समाज निर्माण करायचं होतं आणि त्यानी प्रयन्त केले.आणि त्यांचे अधुरे काम मी पुर्ण करेन असे डॉ बाबासाहेब यानी म्हटल होते.पण जोपर्यंत माणुस हा माणसामध्ये येणार नाही तोपर्यंत हे कार्य पुर्ण होणे कठिणच.असे प्रतिपादन आ.चंद्रीकापुरे यानी सौंदड येथे ६५ व्या धम्मचक्र परीवर्तन दिनानिमित्य दि.१५ ला त्यांनी सडक अर्जुनी येथील धम्मसाधना बुद्ध विहार सौंदड येथे आपल्या मार्गदर्शनातून केले.तसेच सर्वनी पंचशीलेचे योग्य ओर्करे पालन करावे आणि असे म्हणत त्यानी पुर्ण पंच शिलेचे रंगाचे अर्थ उपस्थीत सर्व उपसाक उपसिकेना समजाऊन दिले.आणि शेवटी सांगतले की सर्वनी एकत्र येणे गरजेचे आहे करण एकत्रीकरण हाच आपल्या समाजाचा मुख्य हेतू आहे त्याशिवाय कोणतेही काम पूर्णत्वास येणार नाही.त्यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रामचंद्र भैसारे,प्रमुख अतिथी सरपंचा गायत्री इरले,उपसरपंच सुनिल राऊत,माजी जी प सदस्य रमेश चुर्हे,माजी प.स.सदस्या मंजू डोंगरावर,माजी जी.प.सदस्या रुपली टेंभर्ने,मंजू चंद्रीकपूरे,श्यामराव शिवनकर,मधूसुधं दोनडे , उपस्थीत होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवानी व भगिनींनी परिश्रम घेतले.