कोहमारा येथिल काली माता मंदिरात महाप्रसादाचे कार्यक्रम व घट विसर्जन उत्साहात संपन्न
1 min readगोंदिया, कोहमारा,14 ऑक्टोबर 2021-तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील ग्राम कोहमारा येथील प्राचीन कालि माता मंदिरातील घट विसर्जन व महाप्रसाद वितरण उत्साहात संपन्न झाले.
दरवर्षी प्रमाणे कोहमारा येथील काली माता मंदिरात नवरात्र उत्सव निमित्त घटस्थापना करण्यात येते,
मंदिराची समितीच्या देखरेखीत व परिश्रमाने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येते व घट विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी समस्त ग्राम वासी व भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात येते , त्याच प्रमाणे दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी काली माता मंदिराच्या समोर अतिशय साध्या पद्धतीने व शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून घट विसर्जन करण्यात आले ,तसेच गावातील महिलांनी डोक्यावर कलश घेवून रॅली काडण्यात आली व अगदी शांत पणे व उत्साहाने घट विसर्जन पार पडले.